loader image

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

Jun 11, 2024


मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर महाले (वय ८ वर्ष) हीचे घरातून अपहरण झाले होते. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी शोध घेतला आणि (दि. १५ मे) रोजी तिचा मृतदेह गावाजवळील मोसम नदीपात्रालगत असलेल्या विहीरीत संशयास्पदरित्या आढळुन आला. त्यामुळे या बालिकेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको केले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
मंत्री भुसे यांनी शब्द पाळत
पोलीसांनी या घटनेचा तपास करत या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. तरी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालिकेच्या कुटुंबास न्याय मिळावा म्हणुन या घटनेची सुनावणी ही फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी अशी मागणी मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला आदेश दिले असून हा खटला आता फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे. यामुळे मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा आपला शब्द मंत्री भुसे यांनी पाळला आहे.

वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीच्या वडिलांच्या पुरवणी जबाबावरून या प्रकरणी अपहरण करून तिचा खून व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षीय मुलीचा खून झाल्याने अजंग-वडेलसह तालुक्यातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या.
मंत्री दादा भुसे यांनी दिले होती हमी
सलग दोन दिवस नामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिकाही कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतली होती. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून मुलीच्या नातेवाईकांशी बोलणे करून दिले आणि न्याय मिळवून देण्याची हमी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.