मनमाड – नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षा पासून महाराष्ट्र मध्ये सर्वच शाळांन मध्ये शालेय शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी विध्यार्थ्यांन चे स्वागत केले जाते पण यंदा मनमाड शहरात वाचन,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,साहित्य,क्षेत्रात अत्यंत जागरूक पणे व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन भरीव कार्य करणाऱ्या आणि 110 वर्षाची शतकोत्तर वाटचालीची परंपरा असणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाने नवीन पिढी मध्ये वाचन संस्कार निर्माण व्हावे, विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, व वाचन चळवळ वृद्धिंगत करणे साठी नासिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी विविध वाचनीय पुस्तके देऊन विध्यार्थ्यांन चे स्वागत केले या अभिनव कार्यक्रमाला मनमाड सार्वजनिक वाचनालया अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, जेष्ठ संचालक नरेशभाई गुजराथी,माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट सरस्वती विद्या मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक्ष रमाकांत मंत्री, अक्षय सानप,राहुल लाबोळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकुंभ आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते,सर्व प्रथम विद्येची देवता माता सरस्वती च्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले गत वर्षी प्रत्येक इयत्ते मध्ये प्रथम तीन आलेल्या विध्यार्थ्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले मनमाड सार्वजनिक वाचनालय विध्यार्थ्यांन साठी गेल्या 60 वर्षा पेक्षा जास्त काळात विविध आंतर शालेय निबंध, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करते आहे आजचा विध्यार्थी हा भविष्यात वाचक व्हावा आणि सोशल मीडिया च्या काळात वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असे मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले पुढील वर्षी वाचनालया तर्फे वेगवेगळ्या शाळा मध्ये हा पुस्तके भेटी चा कार्यक्रम घेण्याचा मनोदय सचिव कल्पेश बेदमुथा यांनी व्यक्त केला तर प्रदीप गुजराथी यांनी पुस्तकाचे महत्व यावेळी व्यक्त केले विध्यार्थ्यांना भारतीय थोर राष्ट्र पुरुषांची माहिती असणारे, इतिहास, गड किल्ले, पर्यावरण, संगीत, सुविचार,प्राणी पक्षी, क्रीडा ओळख,पालेभाजी ओळख,ऊर्जा,औषधी वनस्पती, आरोग्य, वृक्ष, विविध सण उत्सव,भाषण, लेखन कला,आदी विषयाची पुस्तके भेट देण्यात आली सरस्वती विद्या मंदिर तर्फे रमाकांत मंत्री यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालया चे आभार ऋण व्यक्त केले यावेळी सरस्वती विद्यालयातील सौ रेवती गद्रे, कुलकर्णी मॅडम, मोरे मॅडम, खैरनार मॅडम, काकाळीज सर प्रशांत उपासनी सर आदी शिक्षक वृंद मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवर सह मोठया संख्येने विध्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...