loader image

विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारे व्हिजे हायस्कूल : ॲड.कासलीवाल

Jun 15, 2024


नांदगाव : मारुती जगधने नांदगाव येथील बैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालयात
नवगतांचे स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड जयकुमार कासलीवाल हे ९२ वर्षाचे आजोबा तसेच नांदगाव शहरातील ज्येष्ठ पञकार, पालक,व शिक्षक,डाॅक्टर आदीं उपस्थित होते.
दरम्यान व्ही जे हायस्कूल मध्ये पुर्वी
११ वी बोर्डाची परीक्षा दिलेले ९२ वयाचे,अॅड जयकुमार कासलीवाल ज्येष्ठ विधी तज्ज्ञ यांनी विद्यालयातील चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत केले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अॅड कासलीवाल म्हणाले की सन १९५३ मध्ये
क्षिण हिंदुस्तान २५०० किमी सायकल प्रवास करुन निरोगी जीवनाचा संदेश दिला ते पुढे म्हणाले व्हिजे हायस्कुल नांदगाव येथे या शाळेच्या प्रांगणात माझे जिवित्त्व घडले आहे.लोकसेवा समाज सेवा हे जो पर्यंत शाळेत संस्कार युक्त पोहचले जातात मी व्हि जे हायस्कूल ला १९५० मध्ये शाळा सोडली ११ वि बोर्डाची परीक्षा केंद्र पेठे हायस्कुल नाशिक येथे प्रथम आलो या शाळेने मला संस्कार दिले म्हणून माझी प्रगती झाली मी राज्य व अर्थशास्ञा चा विद्यार्थी होतो व माझे किर्तीकर यांचे हस्ते मानाचा अंक मिळाला होता.१९५४ ला पुणे येथे लाँ कॉलेजला प्रवेश घेतला खेड्यातल्या मुलांना पदवी परीक्षा व ओपन मेरीट व स्कॉलरशिप मिळाली ७५ रु स्कॉलरशिप मिळाले. काॅलेज चे प्राचार्यांनी माझा हेवा वाटला
शाबासकी दिली तेव्हाची काॅलरशिप आज ७५ हजार रु च्या बरोबरीत आहे .१९४३,४४ मध्ये आईने स्वयंपाक करायचे शिकविले आई आंधळी पांगळी असल्याने माझे मलाच घरातील काम करावे लागायचे दरम्यान याच शाळेत मला सरांनी
रसग्रहन लिहायला सांगीतले तेव्हा मी एकटाच लिहिणारा होतो .तेव्हा
११ वि बोर्डात प्रथम आलो .त्यानंतर काॅलेज पूर्ण झाल्यावर सनद मिळाल्या पासून
३६ वर्षापासून मनमाड,मालेगाव, नांदगाव न्यायालयात वकिली करतो.असे आपला जिवनपट अॅड कासलीवाल यांनी उलगडला .
दरम्याने अध्यक्ष स्थानावरून
ज्येष्ठ पञकार संजीव धामणे म्हणाले १९५० मध्ये शाळांत परीक्षा देऊन यशश्वी झालेले अॅड कासलीवाल यांनी ७५ वर्षानी हा विद्यार्थी नव्यपिढीला मार्गदर्शन करतो आहे .प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती असतो असे नाहि,प्रत्येक
शिंपल्यात मोती असतो असे नाही .शिंपल्याचे मोती तयार करणारी व्हिजे हायस्कूल हि याच शाळेत
अॅड कासलीवाल हे रत्न तयार झाले .असे गौरवोद्गार काढले यावेळी
मुख्याध्यापक एल एन ठाकरे ,उपमुख्याध्यापक खालकर ,
श्रीवास्तव,डाॅ चव्हाण, संजीव निकम,एम बी जगधने ,संदीप जेजुरकर,बेडोदे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व पुस्तकांचे वितरण करण्यात आले .पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.