loader image

के आर टी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Jun 15, 2024


मनमाड – येथील कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा शाळेचा पहिला दिवस म्हणजेच शाळा प्रवेश दिन दि.१५ जून २०२४ रोजी विदयार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत अतिशय आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळा प्रवेश दिनानिमित्त शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर, शाळेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, वैभव कुलकर्णी आणि धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विदयार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस असल्याने याप्रसंगी शाळा प्रवेशव्दार आणि शालेय परिसरात रांगोळी, फुले आणि फ़ुगे यांची सजावट करण्यात आली होती तर विदयार्थ्यांसाठी आकर्षक सेल्फीपॉइंट तयार करण्यात होता.

याप्रसंगी प्राचार्य मुकेश मिसर, प्राथमिकचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, वैभव कुलकर्णी आणि धनंजय निंभोरकर यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर विदयार्थ्यांचे स्वागत करून त्यांना वर्गात पाठविण्यात आले.

केजी विभागातील विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी या विभागाच्या शिक्षिकांनी शाळेत आणि वर्गात रांगोळी, फुगे यांची सजावट केली होती. या चिमुकल्या विदयार्थ्यांचे चॉकलेट देवून स्वागत करण्यात आले.

उपस्थित पालक आणि विदयार्थ्यांसोबत शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शनपर सुचना केल्या.

शाळेचा पहिला दिवस असूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सौ. क्षीरसागर, सौ. उबाळे, श्रीमती मिश्रा, सौ. बिडवे, सौ. रसाळ यांच्यासह इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.