loader image

छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात

Jun 21, 2024


केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुधृदताही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया! असे आवाहन आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रशिक्षक व शाळेचे जेष्ठ पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे यांनी विश्व् योग दिनाच्या निमित्ताने येथे केले.
येथील छत्रे विद्यालयाने विश्व योगदिन भगवान महर्षी वाल्मिकी स्टेडियम वर उत्साहात साजरा केला.या प्रसंगी मैदानावर संस्थेचे जेष्ठ संचालक नाना कुलकर्णी,संचालक प्रसाद पंचवाघ,शाळेचे मुख्याध्यापक आर.एन. थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,वरिष्ठ पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे पर्यवेक्षिका संगीता पोतदार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नामदेव जाधव,स्टेडियम चे केयर टेकर देवेंद्र चुनियान तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रविण व्यवहारे सरांनी संयोजन करत सर्व योगा प्रकार समजावले.व प्रत्येक प्रकारचे आपल्या आरोग्यासाठीचे महत्व सांगितले.राष्ट्रीय खेळाडू कृष्णा व्यवहारे व शाळेचे शिक्षक धनंजय भामरे यांनी केलेल्या प्रत्यक्षिका चे अनुकरण करत सर्व विद्यार्थी व शिक्षक, पदाधिकारी यांनी सर्व प्रकारची आसने केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.