loader image

लोकनेते तुकाराम पाटील यांची पुण्यतिथी महाविद्यालयात साजरी

Jun 21, 2024


 

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालय जमीन देणगीदार व माजी नगराध्यक्ष कै. लोकनेते तुकाराम पाटील यांची ३० वी पुण्यतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम व जमीन देणगीदार प्रतिनिधी श्रीमती अलकाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, श्रीमती पुष्पलता सोनवणे यांनी लोकनेते पाटील यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. यावेळी लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यशोदीप पाटील (शिंदे), कुलसचिव समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.