loader image

साकोरा येथे कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या

Jun 22, 2024


नांदगाव : प्रतिनिधी साकोरा ता.नांदगांव येथील शेतकरी प्रमोद जिभाऊ बोरसे वय ४२ यानी कर्जाला कंटाळून जिवनयाञा संपविली या घटनेने साकोरा गावात शोककळा पसरली आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्तअसे की साकोरा परिसरात गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी, हिंमवर्षाव ,
दुष्काळी परिस्थिती, मुलांचे शिक्षण यामुळे झालेल्या अर्थीक अडचणीत झालेल्या कर्जाला कंटाळून   प्रमोद (मिर्झा)जिभाऊ बोरसे (४२) या शेतकऱ्याने दि २० रोजी रात्री चांदोरा मार्गालगत असलेले शाकांबरी नदिवरील बाळगोंदाई माता मंदिरालगतच्या पाण्याच्या डोहात उडी घेतली.मात्र दुसर्या दिवसी सकाळी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त काही महिला पुजेसाठी या भागात गेल्या असता मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या आवस्थेत दिसला त्यामुळे महिला अचिंबीत झाल्या व शेजारी शेतात असलेले भारत बोरसे यांच्या लक्षात आल्याने तसेच शरद सोनवणे यांनी नांदगाव पोलिसांत खबर दिली.त्यानंतर पोलिसांनी येवून पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.प्रमोदच्या पश्चात आई वडिल , पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.