loader image

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

Jun 28, 2024


मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरक ारकडून अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बह ीण योजनेची घोषणा केली आहे.

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्य ा गेल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा –

राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनात मांडताना अर्थ मंत्री अजित पवार यांनी 2 योजनेची घोषणा केली आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकास 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब ्ध करण्यात येणार असून या योजनेची 2024 पासून करण्यात येईल.

स्त्री ही कुटुंबाचा आधार असून एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या या महिलांना संधी उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.


अजून बातम्या वाचा..

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.