loader image

आंतरराष्ट्रीय ॲबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

Jun 29, 2024


ICMAS (आय.सी.एम.ए.एस) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ॲबॅकस व वैदिक मॅथ चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा २९ मे ते २ जून दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मनमाड मधील गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे चालवल्या जाणाऱ्या ॲबॅकस व वैदिक मॅथ क्लासच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम मनमाड येथील इंडियन हायस्कूल सभागृहामध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मनमाड मधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ देवकी हॉस्पिटलचे डॉ. श्री. रवींद्र राजपूत व स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम राजपूत, के. आर. टी. विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य मुकेश मिसर सर, साकार नेत्रालय आय हॉस्पिटलच्या डॉ. सौ. वसुधा डोंगरगावकर, गुडविल गर्ल्स हायस्कूल चे संस्थापक ॲड. श्री. शशिकांत काखंडकी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार व दीप प्रज्वलनाने झाली. अतिथींनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. व अबॅकस हे मुलांसाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दल मुद्दे मांडून अबॅकस चे महत्व पटवून दिले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी झिरो लेवल पासून सिक्स लेव्हलपर्यंत स्पर्धेत सहभाग घेतला. क्लासमध्ये मनमाड मधील तसेच धुळे नाशिक पुणे गुजरात नागपूर कल्याण चेंबूर इंदोर इत्यादी ठिकाणचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थ्यांना विनर(सर्वोत्कृष्ट विजेता) तसेच दोन विद्यार्थ्यांना फर्स्ट रनर अप या क्रमांकाने ट्रॉफी आणि सर्टिफिकेट पारितोषिक मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना पांडे व जिज्ञासा मोरे या विद्यार्थिनीनी केले. गुंजन गवळी व साची जाधव यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका सौ. वृषाली पांडे व सौ. हर्षा मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा

मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री...

read more
.