मनमाड – मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दुचाकी चोरीच्या घटनांचा विशेष पोलिस तपास करीत असतांना गुप्त माहितीच्या आधारे आकाश राऊत याला चोरीच्या दुचाकी विक्री करतांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर या चोरीला उलगडा झाला.
राऊत याने चांदवड, लासलगाव, येवला येथून साथीदारांच्या मार्फत दुचाकी चोरल्या. डीबी पथकाने सापळा रचून दुचाकी चोरटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी आकाश यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर चोरीच्या दुचाकी विक्री कोणाला विक्री केल्या त्याचा छडा लावत तब्बल २३ दुचाकी जप्त करण्यास पोलिस पथकाला यश आले. या प्रकरणी चौघाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

राशी भविष्य : ९ जुलै २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....