loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नजिक दोन वाहनांचा अपघात जीवित हानी नाही मद्यपान करुन वाहन चालवल्याने अपघात?

Jul 25, 2024


 

नांदगाव : मारुती जगधने
नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दोन मालवाहु ट्रक कंटेनरचा चालकाला डुलकी लागल्याने व मद्य प्राशन करून वाहन चालवल्याने अपघात झाला .
४० गांव चांदवड नॅशनल हायवे ७५३ जे वर मध्यराञी दोन वाहनांचा अपघात झाला या घटनेत जीवित हानी झाली नाही पण दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले एक झपकी एक अपघात आणी दुसरा अपघात वाहन चालकाने मद्यप्राशान केल्याने हा अपघात झाला? दोन्ही अपघात एकाच ठिकाणी एक तासाच्या अंतरावर घडले .दोन्ही वाहनांचे चालक माञ बालंबाल बचावले
दि २३ जुलैच्या मध्यराञी दुचाकीचे स्पेअरपार्ट घेऊन जाणारा कंटेनर NL/01/ Q 2641 हा कंटेनर छञपती संभाजी नगर हुन नांदगाव मार्गे मनमाड दिशेने जात असताना नांदगाव नजीक ४ किमी अंतरावर मातोश्री मंगलकार्यालया जवळ मध्यराञीच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने कंटेनर रोडच्या बाजूला पलटी होऊन ३३ ००० HP पावरच्या वीज वाहक खांबार जाऊन आदळला यावेळी विजपुरवठा बंद पडल्याने पुढील अनार्थ टळला, दुसर्यादिवसी क्रेनच्या मदतीने कंटेनर उभा करण्यात आला या अपघातात महाविरणचे हजारो रूपयांचे नुकसान झाले त्याची भरपाई वाहन मालकाकडून करण्यात आली राञी उशिरा पर्यंत विजेचे खांब उभे करुन विजपुरवठा सुरळीत करण्यात आला ,या अपघातात एका वीज खांबाला धडक बसल्याने पाच विजेचे खांब बाधित झाले होते.
दुसरा अपघात या चा मार्गावर याच ठिकाणी एका तासाच्या फरकाने घडला या अपघातात वाहन क्रमांक MH 19/CV 9262 हा एैशियर टेंम्पो नांदगाव हुन मनमाड दिशेने जात असताना चालकाने मद्यपान केले ?असल्याने सदरचा टेम्पो दुभाजकावरुन उडुन दुसर्या मार्गावर गेला या प्रसंगी दुभाजकावरील पथदिप चा खांब तोडून मातोश्री मगलकार्यालयाच्या भिंतीलगत थांबला यात गाडीचे मोठे नुकसान झाले या वेळी टोलरोडवरील संबंधीत ठेकेदारने भरपाई करुन घेत टेंम्पो सोडून दिला या पूर्वी याच ठिकाणी लहनमोठे अपघात झाले तेव्हा पथदिपचे विजेचे खांब तोडले त्यांची भारपाई मिळाली? पण ते पथदिप पुन्हा उभेकेले नाहीत आत्ता पर्यंत पाच पथदिप खांब तुटले भरपाई मिळून देखिल ते नविन बसवले नाही अशी ओरड फुलेनगर वासीयांनी केली .
दरम्यान नांदगाव ते मनमाड नॅशनल हायवे वर नांदगाव शहरातुन निघालेला दुभाजक चार पदरी मार्गा वर मातोश्री मंगल कार्यालया जवळ हा रस्ता चार पदरीचा दोन पदरी झाल्याने या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद झाल्याने वाहन धारकांची मार्गपास करताना तारांबळ उडते समोरून येणारे वाहन आपल्या अंगावर येते की काय अशी भिती वाहनधारकांना वाटते आणी या दुभाजक रस्ता संपताच अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत या ठिकाणी असलेल्या अरुंद रस्ता रुंद करुन वाहनांचा मार्ग मोकळा करुन होणारे अपघात टाळावेत अन्यथा येथे अपघात होतच राहतील तसेच याच मार्गावर हाॅटेल माऊली जवळ रस्त्यावरील साईड पट्ट्या आजुन रूंद केलेल्या नाही या मुळे अपघात होत आहेत पाच वर्षे झाले रस्ता बनवुन आणी एक. वर्षापासून टोल जकात वसुलीचा धडाका चालु आहे पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे व पथदिपांच्या दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष देत नाही बर्याच वेळा मध्यराञी अंधार्याराञी पथदिप बंद केले जातात त्यामुळे पादचार्यांचे व पहाटे व राञी फिरायला जानार्या महिला व वृध्दांची कुचंबना होते या कडे संबंधीत विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.