loader image

नाशिक जिल्हा स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा संघ विजयी

Aug 12, 2024


मनमाड:- क्रिडा व युवकसेवा संचालनालय पुणे, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक मार्फत आयोजित जिल्हा स्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा.

दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मानूर ता. कळवण जि. नाशिक येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलचा (१४ वर्षाआतील (मुली) संघ विजेता ठरला आहे.

मनमाड येथील गुड शेफर्ड स्कुलच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

कु. मनस्वी परदेशी, कु तन्वी परदेशी व कु. श्रेया साळवे या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक व्यंकटेश देशपांडे सर व सचिन पगारे सर यांनी केले.

संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.