मनमाड – शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 32 रक्तदात्यांचे रक्तार्पण
मनमाड – 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने मनमाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन 2005 पासून यंदा सलग 20 व्या वर्षी स्वातंत्र्ययुध्दात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशासाठी प्राण अर्पण करणार्या शहीद सैनिकांना रक्तदानाने आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा नाशिक जिल्हा (उत्तर )अध्यक्ष शंकरराव वाघ भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार, एकनाथ बोडखे,भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा जेष्ठ भाजपा नेते कांतीलाल लुणावत नीलकंठ त्रिभुवन आदी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. शिबीर संयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी गत 20 वर्षापासून अखंड भारत दिनाचे स्मरण व्हावे म्हणून सर्व ऐच्छिक रक्तदात्यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा यज्ञ सुरु ठेवला आहे कोरोना संकट काळात भाजपा मनमाड तर्फे कोविड रुग्णांन सह इतर सर्व रुग्णाना रक्ता संबंधित भरीव मदत झाली असल्याचे याप्रसंगी सांगितले. तर मनमाड शहर भाजपा ने दोन दशके म्हणजे च गेल्या 20 वर्षा पासून देशभक्तीचा वसा घेत रक्तदान क्षेत्रातील अखंडीत सेवा कार्य सुरु ठेवले आहे हे गौरवास्पद आहे असे आपले शुभारंभीय मनोगत मध्ये जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांनी व्यक्त केले या भाजपा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशी यांनी केले. भाजपतर्फे 2005 पासून सलग या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. एकच तारीख, एकच ठिकाण, एकच संयोजक व एकच रक्तपेढी असे सलग दोन दशके म्हणजे 20 वर्ष पूर्ण होण्याचा हा विक्रम या रक्तदान शिबीराच्या संयोजनाने मनमाड भाजपा शहर मंडलाने केला आहे. गेल्या 20 वर्षात सुमारे 1000 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यंदाही 32 ऐच्छिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून स्वातंत्र्यवीरांना या रक्तदान शिबीरात रक्तदानाने श्रध्दांजली वाहिली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास , भारतीय मजदूर संघाचे कामगार नेते श्रावणदादा जावळे जेष्ठ भाजपा नेते उमाकांत राय,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा महिला मोर्चा बेटी बचाव बेटी पढाव अभियाना च्या जिल्हा संयोजक सौ स्वाती ताई मुळे भाजपा व्यापारी आघाडीचे हरदीप सिंग चावला भाजपा शहर सरचिटणीस आनंद काकडे ,अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा, भाजपा मन की बात जिल्हा संयोजक दीपक पगारे,आरपीआय नेते गंगादादा त्रिभुवन,बुधण बाबा शेख ,गौरव ढोले, शहर चिटणीस केतन देवरे ,शहर चिटणीस धीरज भाबड, भाजपा शहर उपाध्यक्ष आशिष चावरिया ,गजाभाऊ कासार कैलास देवरे, अमित सोनवणे भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर,भाजपा दिव्यांग आघाडी चे बुऱ्हाण शेख तौसिफ़ तांबोळी,,निफाड मंडल अध्यक्ष केशव अप्पा सुरवाडे,राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे रमाकांत मंत्री,अनंता भामरे, अक्षय सानप, मकरंद कुलकर्णी,राहुल लांबोळे, शंकरराव सानप,राजेश पाटील प्रवीण धाकराव, विजय माळवकर, अनंता कुलकर्णी राजस काकडे,अजित राऊळ आदीं मान्यवरा सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रक्तदाते याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या गौरव प्रमाणपत्र देवून रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. नाशिक येथील जनकल्याण रक्तकेंद्रा च्या वतीने प्रदीप देशमुख आणि त्यांच्या सहकार्या नी यांनी रक्तसंकलन केले. शिबीराचे संयोजन जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले तर भाजपा मनमाड शहराध्यक्ष संदीप नरवडे सरचिटणीस आनंद काकडे,, दिपक पगारे, सुमेर मिसर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.



























