loader image

मनमाड महाविद्यालयात कबड्डी स्पर्धा संपन्न

Aug 15, 2024


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेली कबड्डी स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेसाठी मनमाड मधील नामांकित अशा आठ संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक समता क्रीडा मंडळ मनमाड, तृतीय पारितोषिक जय भवानी क्रीडा मंडळ मनमाड, द्वितीय पारितोषिक एकलव्य क्रीडा मंडळ मनमाड, तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सम्राट क्रीडा मंडळ मनमाड या संघाने पटकावले. उत्कृष्ट पकड साठी जयभवानी व्यायाम शाळा संघाचा कु अनिल अहिरे, उत्कृष्ट चढाई साठी एकलव्य किडा मंडळ संघाचा कु.सागर वाघ, अष्टपैलु खेळाडु सम्राट क्रिडा मंडळ संघाचा कु. अथक कलापुरे यांची निवड करण्यात आली.
सदर स्पर्धा एस.एन.जी. बी. चांदवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी, अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रवीण व्यवहारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. बी एस देसले डॉ. जे डी.वसईत, सेवानिवृत प्रा डॉ. जालिंदर इंगळे यांच्याप्रमुख उपस्थितीत पार पडली.या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे अकाउंटंट प्रशांत सानप क्रीडाशिक्षक महेंद्र वानखेडे क्रीडा संचालक प्राध्यापक सुहास वराडे रोहित बागुल यांनी सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

 


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.