loader image

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

Aug 16, 2024


बातमी :
दिनांक: १५/०८/२०२४

. शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या विदयार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते दरवर्षी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यात येते. मार्च 2024 मध्ये कु.श्रावणी अमर चव्हाण ही विदयार्थिनी ९५.२०% मार्क घेवून शाळेत प्रथम व मनमाड केंद्रात दुसरी आल्याने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तिचे पालक इंजि.अमर चव्हाण आणि सौ. वैशाली चव्हाण तसेच काका इंजि. विक्रम चव्हाण, सौ. वृषाली चव्हाण व आजी श्रीमती विजया चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्राचार्य मुकेश मिसर यांनी केला. प्राचार्य श्री. मुकेश मिसर, जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे आणि संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे इंजि. अमर चव्हाण, सौ. वैशाली चव्हाण आणि उपस्थित पाहुणे इंजि.विक्रम चव्हाण, सौ. वृषाली चव्हाण आणि श्रीमती विजया चव्हाण या सर्व कुटूंबियांचा सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त श्री. तुषार चौधरी यांची एफ.सी.आय. तृतीय श्रेणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्री. मुकेश मिसर यांच्याहस्ते शाल आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंजि. अमर चव्हाण यांनी आपल्या मनोगतात महिलांचे कर्तृत्व अफाट असल्यामुळे महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे असे सांगत शाळेने विदयार्थ्यांसाठी केलेल्या मेहनतीचे, मार्गदर्शनाचे कौतुक केेले. शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा विदयार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा सहभाग असतो. विदयार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून शाळेत राबविलेल्या 3 सराव परीक्षा यामुळे विदयार्थ्यांनां दहावीच्या परीक्षेत सुनियोजित यश मिळतेच हे मागील अनेक वर्षाच्या निकालातून शाळेने सिध्द केले आहे. आमच्या कुटूंबातील सर्व सदस्य केआरटी शाळेचेेच विद्यार्थी आहेत ते केवळ शाळेच्या गुणवत्तेवरच्या विश्वासामुळेच अशा शब्दात शाळेचा त्यांनी गौरव केला. शाळेचे कर्तृत्व आणि लेकीचे कौतूक जितके करावे, तितके कमीच आहे. असे सांगतांनाच अशी लेक आमच्यापोटी जन्मली हे आमचे भाग्य असे गौरवोद्गार काढले. सौ. वैशाली चव्हाण यांनी मुलीच्या कर्तृत्वामुळे झेंडावंदनाचा सन्मान प्राप्त होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने हा सन्मान आपल्या आई-वडिलांना, कुटूंबांना मिळावा यासाठी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे सांगितले.

शाळेच्या परंपरेप्रमाणे दहावीत पहिल्या पाच गुणानूक्रमांक मिळविणा-या कु. श्रावणी अमर चव्हाण, आदित्य राजेश सोनवणे, कु. सई विनोद सोमासे, कु. प्रसिध्दी चंद्रशेखर दखने, कु. तनुजा संजय पगारे आणि सार्थक रितेश कोटकर या 6 विदयार्थ्यांचा आकर्षक सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देवून शाळा व संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. विदयार्थ्यांच्या
मनात प्रत्येक विषयाची आवड निर्माण व्हावी व त्यात त्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त करण्याची प्रेरणा घ्यावी यासाठी शाळेतील सर्व विषयशिक्षकांकडून आपापल्या विषयात प्रथम येणा-या विद्यार्थ्यास रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. स्वातंत्त्र्यदिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणा-या मिलिंद गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत याही वर्षी मागील लाभार्थी वेदांत नरेंद्र जोशी, कु. धनश्री बाळू घुगे यांच्याबरोबरच यावर्षी आदित्य राजेश सोनवणे या विदयार्थ्यांला संस्थेच्यावतीने शिष्यवृत्तीचे धनादेश प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विदयार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढीस प्रेरणा मिळावी म्हणून शाळेचे हितचिंतक श्री. शरद जगताप यांचेकडून प्रथम पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारितोषिक व श्री. सुधाकर गरूड यांचेकडून प्रथम तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रकमेचे पारितोषिक, सौ. शोभाबाई लहानू संसारे यांचेकडून प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख रकमेचे पारितोषिक तर श्री. प्रदीप संसारे यांच्याकडून प्रथम तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह उपस्थित पाहूणे व संस्था पदाधिका-यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. विदयार्थी गुणगौरव व सुत्रसंचलन सौ. संगिता कदम यांनी केले.

याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात श्रेया ताठे, स्वयम सरोदे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इ.3रीच्या विद्यार्थिनींनी ‘देेश रंगिला रंगिला हे नृत्य सादर करून उपस्थित पालकांची दाद मिळवली. सचिन बिडवे यांनी विद्यार्थ्यांसह वंदे मातरम हे समूहगीत सादर केले.

कार्यक्रमास प्राचार्य श्री. मुकेश मिसर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, धनंजय निंभोरकर, किशोर माळी, मनोज छाबडा, तुषार चौधरी, डाॅ. प्रदिप साळी, श्री. गणेश लहाने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. तनुश्री नाईक व कु. खुशी वाजे या विदयार्थींनींनी अतिशय नीटनेटके व सुंदर पध्दतीने केले. खुशी वाजे या विद्याथिर्नीने सुत्रसंचलनात सादर केलेल्या ‘तू एक इंचभी पिछे मत हटना, चाहे इंच इंच कट जाना’ या हिंदी कवितेनेे उपस्थितांचे डोळे पाणावले तर कवीवर्य कुसुमाग्रजाच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विणवणी’ या मराठी कवितेने उपस्थितांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाला माजी विदयार्थी व पालकांची कुटूंबियांसोबत उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.