loader image

सौ. क. मा. कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा

Sep 5, 2024


नांदगांव : सौ. क. मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी बनवावी याचे कृतीयुक्त मार्गदर्शन श्रीमती. धन्वंतरी देवरे यांनी केले. शाळेत शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली कलेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यालयात दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मातीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही. याचे महत्त्व श्रीमती. निलोफर पठाण यांनी पटवून दिले. तसेच विद्यालयाकडून विद्यार्थ्यांना शाडू माती पुरवण्यात आली. शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन .सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष. सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगल किशोर अग्रवाल, महेंद्र चांदीवाल, आनंद कासलीवाल, मुख्याध्यापक व्ही. पी. सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, तुषार जेजुरकर, श्रीमती.वैशाली शिंदे, जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत,अर्चना बोरसे पूनम खोंडे, शालिनी निकम, निकिता देशमुख, स्नेहल आढाव यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाडूच्या माती पासून बनवलेल्या मूर्ती घेण्यास सांगितले.व इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापक व्ही.पी सावंत यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.