loader image

मनमाड महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Sep 8, 2024


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 5 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतभर 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. महेश महाले यांचे गुरु-शिष्य संस्कार संबंध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय संस्कृतीची गुरुकुल शिक्षण पद्धती, गुरु शिष्य संवाद, संत परंपरा यातील विविध उदाहरणांद्वारे गुरु शिष्य परंपरेचे संस्कारसंबंध अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ. बी एस देसले यांनी आपल्या मनोगतातून आजच्या मोबाईल सदृश्य युगामुळे गुरुजन व विद्यार्थी यांच्यातील दुरावलेला संवाद हे शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याचे आहे असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शैक्षणिक परिवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, कुलसचिव श्री समाधान केदारे, डॉ. आर. एन. वाकळे, डॉ जे.डी.वसईत, डॉ पी टी वानखेडे, डॉ आशिष गजबे, डॉ.ए. के. आहेर, डॉ व्ही.जी.राठोड, डॉ. सुनील घुगे, डॉ. आर. ए. जाधव, प्रा. पी. आर. बर्डे, प्रा. शरद वाघ, प्रा. कोरडे हे उपस्थित होते. एनएसएसच्या स्वयंसेविकांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून फलक रेखाटन केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व शिक्षकांवर ची कविता गायत्री जाधव हिने सादर केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पवनसिंग परदेशी, तर आभार प्रा सोमनाथ पावडे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.