loader image

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

Sep 13, 2024


नांदगांव : दि १३ मारुती जगधने
दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये नुकतीच गणेशोत्सवानिमित्ताने इयत्ता नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या माता पालकांसाठी कुकिंग बॅटल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 40 ते 50 माता पालकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपल्या कुशल अशा पाककलेतून वेगवेगळे स्वादिष्ट असे पदार्थ बनवले होते. या पदार्थांचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे कुकिंग विदाऊट फ्लेम्स केलेले पदार्थ होते. प्रत्येक पदार्थाची चव खूपच चविष्ट, रुचकर होती. स्पर्धेत माता पालकांचा उत्साह अवर्णनीय होता. या स्पर्धेमध्ये फुलांसारखे रेखीव मऊसूद कळीदार मोदक, ब्रेडरोल, पानमसाला, चटपटीत चना मोजिटो पेय, दहिवडा, नाचो चार्ट, ड्रायफूट मोदक, पान मोदक, भेल चार्ट, मस्तानी लस्सी, ओरिओ ज्यूस, डायफ्रूट लाडू आणि ब्रेडचे विविध प्रकार सर्व पदार्थांची चव रुचकर आणि लज्जतदार होती. या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून मोहिनी देसले, धन्वंतरी देवरे, योगिता गायकवाड यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा निकाल जाहीर करणे पर्यवेक्षकांनी साठी खूपच चुरशीची लढत होती. त्यामुळे प्रत्येक सहभागी स्पर्धकाला उत्तेजनार्थ भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व सहभागी स्पर्धेक माता पालक स्पर्धेच्या वेळी खूपच उत्साही होत्या.
सर्वच सहभागी माता पालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्या बद्दल संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, रिखबकाका कासलीवाल, जिगोलकिशोर अग्रवाल, महेंद्र भाऊ चांदीवाल, तसेच प्राचार्य मनी चावला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रशंसा केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.