loader image

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

Sep 18, 2024


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. शेषराव चौधरी व उप प्राचार्य डॉ. बी एस देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान राबवून करण्यात आली. “स्वभाव स्वच्छता,संस्कार स्वच्छता” या संकल्पनेनुसार वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान राबवून तसेच गणपती विसर्जनाच्या वेळेस झालेल्या निर्मल्य कचरा पाण्यामधून काढून एकत्र करण्यात आला व मनमाड नगर परिषदेच्या सहकार्याने कचरा धरण परिसरातुन उचलण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून आपण प्रत्येकाने स्वतः स्वच्छतेसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपण स्वतः कोठेही अस्वच्छता करायला नको असा संदेश यावेळी दिला.रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, प्रा. सोमनाथ पावडे यांच्यासोबत प्लास्टिक मुक्त अभियान वागदर्डी धरण परिसरात राबविले. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

.