loader image

साईराज परदेशी ने पटकावले युथ मध्ये सुवर्णपदक सीनियर्स मध्ये रौप्य

Sep 19, 2024


सुवा फिजी येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चँपियनशिप स्पर्धेत मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज राजेश परदेशी याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत ८१ किलो वजनी गटात युथ मध्ये १३४ किलो स्नॅच १६५ किलो क्लीन जर्क २९९ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत युथ मध्ये सुवर्णपदक व सीनियर्स मध्ये रौप्यपदक पटकावले
सर्व सामान्य कुटुंबातल्या साईराजचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक असून अतिशय जिद्द व मेहनतीने त्याने यश संपादन केले आहे
साईराज ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व सध्या फिजी येथे भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

बघा व्हिडिओ : कसाऱ्याच्या पुढे पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटली – काही अंतरावर जाऊन इंजिन आणि डबा थांबल्याने पुढील अनर्थ टळला

मनमाड – मनमाड हून मुंबई येथे रोज जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही कसारा स्टेशन जवळ कपलिंग तुटल्याने...

read more
नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
.