loader image

राज्यात धनगर समाज आंदोलकासह शेळ्या मेंढ्या सामील रास्ता रोकोने चक्का जाम

Sep 24, 2024


नांदगाव : मारुती जगधने हातात पिवळा ध्दवज घेऊन शेकडो आंदोलक मेंढ्या सोबत रस्त्यावर आंदोलनास सज्ज झाले होते या दरम्यान जय मल्हार चा जयघोष करीत आंदोलक आक्रमक झाले होत ते आपल्या मागण्यावर ठांम होते. एका बाजूला आंदोलक तर दुसर्या बाजूला शेकडो पाळीव. शेळ्या – मेंढ्या ना देखील आंदोलनात सामील केले होते.आसे हे आगळे वेगळे आंदोलन पोलिसांनी संयमाने हाताळले.
दि २३ रोजी राज्यात धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी सर्वञ
रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले यामुळे राज्यातील आनेक प्रमुख शहरातील व रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

धनगर समाजाच्या वतीने नांदगांव येथे एकञ येऊन मागण्यासाठी रास्ता रोको केला सुमारे ४० मिनीटे हा रस्ता रोको हुतात्मा चौकात चालू होता. यावेळी दुतर्फा सुमारे दिड ते दोन किमी अंतर वाहनांची रांग लागली होती नंतर रस्ता रोको स्थगित करण्यात आल्या यावेळी पोलिसांना बराच वेळ वाहतूक सुरळीत करण्यास लागला.
धनगर समाजाच्या मागण्या विविध स्तरांवर आहेत, मुख्यत्वे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आहेत. खाली काही महत्त्वाच्या मागण्या दिल्या आहेत:नाशिक जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर हे आंदोलन छेडणयात आले याचे परीणाम रस्ता वाहतुकीवर झाले .प्रवासी गाड्या, खाजगी वाहने मालवाहु ट्रक अॅटो,इतर लहान मोठी वाहने रस्तारोकोने थांबुन होती जिल्हायात नांदगांव नाशिक, बागलाण,
,मालेगांव ,येवला, सह सर्वञ आंदोल छेडले गेले.
1. आरक्षण: धनगर समाजाची प्रमुख मागणी म्हणजे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षणाची मागणी. सध्या त्यांना इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण आहे, परंतु ST आरक्षणामुळे त्यांना अधिक फायदे मिळतील असे समाजाचे मत आहे.

2. शैक्षणिक सुविधा: शाळा-कॉलेजांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, स्कॉलरशिप आणि इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली जाते. यामुळे समाजातील तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन मिळेल.

3. आर्थिक विकासासाठी योजना: धनगर समाजाला शेती, पशुपालन, तसेच लघु उद्योजकतेसाठी विशेष आर्थिक सहाय्य, सबसिडी आणि कर्ज सुविधा पुरविण्याची मागणी आहे. यामुळे समाजाचा आर्थिक विकास होईल.

4. सामाजिक सन्मान: धनगर समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक योगदानाला मान्यता मिळावी आणि त्यांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रम किंवा धोरणे राबवावीत, अशीही मागणी आहे.

5. राजकीय प्रतिनिधित्व: स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर राजकीय प्रतिनिधित्व वाढावे आणि समाजाच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांना योग्य जागा मिळावी, अशी अपेक्षा आहे.
नांदगांव येथे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन शांतपणे हताळले
दरम्यान धनगर समाजाने केलेल्या मागण्या
समाजाच्या एकूण प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्यास धनगर समाजाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती सुधारेल.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.