loader image
[ays_poll id=7]

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

Sep 30, 2024


 

नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक हृदय दिवस साजरा केला. या विशेष कार्यक्रमात अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमात हृदय विकार तज्ञ डॉ. गिरीश बच्चव, डॉ. कांचन भांबरे, तसेच हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अजय हिरक्कनीवर यांनी महत्त्वाची माहिती दिली. आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ. चेतन बीजवाल यांनी CPR आणि BLS ट्रेनिंग देऊन याबद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच रोटरी क्लब नाशिक वेस्ट झोनचे अध्यक्ष आदित्य जाजू, सेक्रेटरी डॉ. नागेश डोलारे आणि मंजू सारसंनबी हे मान्यवर उपस्थित होते.

डॉ. चेतन बीजवाल यांनी CPR आणि BLS (Basic Life Support) ट्रेनिंग सत्राद्वारे उपस्थितांना तातडीने आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

डॉ. गिरीश बच्चव आणि डॉ. कांचन भांबरे यांनी हृदयाचे आरोग्य आणि त्याविषयी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांची शंका दूर केली. प्रशनोत्तरे सत्राद्वारे तज्ञांनी उपस्थितांची मनं जिंकली.

हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अजय हिरक्कनीवर यांनी बायपास शस्त्रक्रियेत आलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, यावर मोलाचे सल्ले दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विसपुते मॅडम यांनी केले, डॉ. नागेश डोलारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल आणि रोटरी क्लब नाशिक वेस्टचे विशेष आभार मानले


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.