मनमाड – संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या शिवकालीन इतिहासानंतर चारशे वर्षांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास ठेवून एकजूट झालेला असताना शासन ,प्रशासन , सत्ताधारी आणि विरोधी राज्यकर्ते सातत्याने मराठा समाजाच्या ज्वलंत आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे..खिल्ली उडवीतआहे गेल्या 42 वर्षांपासून मराठा आरक्षण आणि इतर मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर समाजाचे 400 च्या वर बळी गेले तरीही राज्यकर्ते जाणून-बुजून हेतू पुरस्कर समाजाला दुष्ट हेतूने मोडीत काढण्याचे प्रयत्न करीत आहे या सर्व व्यवस्थेला आणि परिस्थितीला कंटाळून आणि जरांगे पाटलांच्या आदेशावरून नांदगाव 113 विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य आणि तरीही सर्व मान्य उमेदवार देण्याची चाचपणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती याच दरम्यान नांदगाव तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांनी आग्रह धरल्यावरून नांदगाव तालुक्यात देव माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर रोहन बोरसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नांदगाव तालुक्यातील भ्रष्टाचार ,निकृष्ट दर्जाचीकामे, दहशत ,जातीभेद, गुंडगिरी मोडीत काढून भयमुक्त , आनंदी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करुन शास्वत विकासासाठी नांदगाव तालुक्यात जनसंख्येत नंबर एक असलेल्या मराठा समाजाच्या वतीने उमेदवार देण्याचे नियोजित असून लवकरच डॉक्टर रोहन बोरसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे
भास्कर विष्णु झाल्टे,
मराठा आरक्षण उपोषणकर्ते
तथा जिल्हा उपाध्यक्ष,
अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण यांनी सांगितले.









