loader image

दिवाळी आनंदाची अंतर्गत आनंद बोथरा यांच्या वतीने फराळ वाटप!

Oct 24, 2024


 

आनंदाची दिवाळी या उपक्रमांतर्गत मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. आनंद बोथरा यांच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनमाड बाजार समितीचे सभापती दिपक गोगड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. आश्रमशाळेच्या वतीने प्रमुख अतिथीचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हबीब शेख, योगेश जाधव, जावेद शेख, शुभम आहेर, श्रीराज कातकडे, सुफियान शेख, आदी उपस्थित होते. कार्यक्रम उपस्थिती बद्दल आनंद बोथरा यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
.