loader image

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Dec 17, 2024


दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे व साईराज राजेश परदेशी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे आकांक्षा सलग पाच वेळा व साईराज सलग तीन वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असून दोन्ही खेळाडूंकडून भारतीय संघाला पदकाची अपेक्षा आहे
भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरात दोन्ही खेळाडूंचा सराव सुरू आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर भारतीय संघाचे प्रशिक्षक आलोकेश बरुआ यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस माध्यमिक विद्यालय वागदर्डी चे मुख्याध्यापक संतोष भराडे महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.