loader image

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

Jan 1, 2025


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन परिपत्रक व सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्या पत्रकानुसार सर्व विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत” ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ‘व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन’ या विषयावर प्रा. डॉ. किरण पिंगळे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी त्यांनी वाचन हे व्यक्तिमत्व विकासासाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दलचे आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाचे संयोजक व ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.डॉ. राहुल लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विष्णू राठोड यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. वी. आर. सातपुते यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एस देसले, कुलसचिव श्री समाधान केदारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.विठ्ठल फंड, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रोहन बागुल व श्री रमेश कुवर यांचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.