ब्रम्हपुर ओडिशा येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग मध्ये आनंदी सांगळे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत ८१ किलो यूथ वजनी गटात ८२ किलो स्न्याच ९० किलो क्लीन जर्क १७२ किलो वजन उचलून उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
आस्मित खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धेत लागोपाठ दोन सुवर्ण पदके मिळवित आनंदीने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले
छत्रे विद्यालयात ई ९ वि त शिकत असून माजी नगरसेवक बंडू नाना सांगळे यांची नात आहे
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
मकर संक्रांत निमित्त फलक रेखाटनातून सामाजिक संदेश
दि.१४ जानेवारी २०२५. मकर संक्रांत या सणाला पतंग उत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे.लहान असो...