loader image

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

Jan 15, 2025


 

राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज महिला मंडळ च्या मार्गदर्शन नें व प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक यांच्या प्रतिमेस हार-फुल अर्पण करून वंदन करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत,जिजाऊ वंदनेद्वारे उपस्थित बांधवानी माँ साहेब जिजाऊंच्या विचारांचे स्मरण केले व प्रेरणा घेतली.
तसेंच शिवकन्या प्राजक्त ताई नलावडे व शिवकन्या संगीता ताई देसले यांचे व्याख्यान आयोजित केले होतें
कार्यक्रमादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी
“स्वराज्य स्थापनेमध्ये मासाहेब जिजाऊंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांच्या मनातील स्वराज्य साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. स्वराज्य स्थापनेसाठी मासाहेबांनी गनिमी काव्याची रणनीती, युद्ध कौशल्य, व न्यायासाठी समानतेची शिकवण दिली. त्यांनी प्रत्येक मावळ्यात स्वाभिमान व स्वराज्य स्थापनेचा दृढ विश्वास निर्माण केला.ते पुढे म्हणाले,
“मासाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या काळात त्यांनी स्वतः राज्यकारभार सांभाळला आणि वेळोवेळी मोलाचे योगदान दिले.त्यांच्या विचारांवर आधारित राज्यकारभारामुळेच शिवराय आणि मावळे आपले ध्येय साध्य करू शकले.”
कार्यक्रमाच्या शेवटी,सर्व महिला पदाधिकारी यांनी उपस्थित बांधवाना संकल्प दिला की, स्वराज्याच्या विचारांचे पालन करणे आणि समाजासाठी कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे.

यावेळी मराठा समाजाचे लहान मुली माँ साहेब जिजाऊ यांची वेषभुषा कुमारी आराध्य सूर्यवंशी. कुमारी आद्विका सूर्यवंशी. कुमारी आनंदी स्वराज्य शिंदे यांनी केलेली होती यावेळी अनेक बांधव उपस्थित होतें महिला सदस्य सुषमा नलावडे. रेखा ताई येणारे. . सुवर्णा ताई निकम. सुरेखा ताई धुमाळ रंजना ताई मेगाने. उषा देवकर अलका राऊत. नेहा वाबळे. रेखा मगर. सुचिता खताळ निर्मला परदेशीं. अंकिता देवगिर शालिनी मढे. पूनम डोंगरे. निशा शिंदे. माधुरी कदम. साधना पाटील. वर्षा ताई झाल्टे . प्रीती शिंदे कोमल शिंदे मेघा शिंदे तेजू देवगिर अशा अनेक महिला सदस्य व सकल मराठा समाज चे सर्व नगरसेवक व नेते व युवा कार्यकर्ते. जेष्ठ श्रेष्ठ सदस्य हे मोठया प्रमाणात उपस्थित होतें
यांसहअनेक मराठा समाज मंडळ चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा समाज चे युवा सदस्यांनी यांनी केले तर आभार मंगल ताई सूर्यवंशी मावशी व ज्योती ताई कवडे पाटील यांनी मानले
जय जिजाऊ! जय शिवराय!


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.