loader image

कविटखेड शिवरात बिबट्या संचार; आदिवासी चिमुकल्याचा घेतला जीव

Jan 16, 2025


 

नांदगाव – मारुती जगधने नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण पासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कविटखेडा शिवारात बिबट्याचा संचार वाढला असून एका आदिवासी चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कविटखेडा शिवरातील शेती गट नंबर 113 मध्ये गोरख काशिनाथ चव्हाण यांच्या शेतात एम. पी.चे लेबर दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी बुधवारी दुपारच्या वेळेस कापूस वेचत असताना लहान मुलगा नामे महेश सिद्धार्थ आखाडे बसलेला असताना त्याच्यावर बिबट्याने जडप घालून उचलुन शेजारील ज्वारीच्या शेतात नेला. परंतु आरडा ओरडा केल्याने व बाजूच्या शेतामध्ये ट्रॅक्टर होते. त्या ट्रॅक्टर ज्वारीच्या शेतात नेला तेव्हा सदरच्या बिबट्याने त्या मुलाला सोडून पळ काढला. मात्र सदर लहान मुलचा मृत्यू झाला होता. या बिबट्याच्या संचारामुळे कविटखेडा , वळण परिसरासह बोलठाण परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सदरची घटना घडल्यानंतर या चिमुकल्याचे फोटो व बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदगाव तालुक्यात पोखरी फुलेनगर जळगाव खुर्द बुद्रुक या भागामध्ये बोलठाण परिसरात घाटमाथ्यावर बिबट्याचे सातत्याने वावर होत आहे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वन विभागाने संबंधित ठिकाणी जाऊन उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशी मागणी नागरिक करत आहे.

 


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.