डेहराडून उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुकुंद संतोष आहेर ला चुरशीच्या लढतीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले अवघ्या एक किलोने हुकले सुवर्णपदक
५५ किलो वजनी गटात संपन्न झालेल्या चुरशीच्या लढतीत मुकुंद ने ११२ किलो स्न्याच १३५ किलो क्लीन जर्क एकूण २४७ किलो वजन उचलत सलग दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केले
मुकुंद ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...









