डॉ. बाबासाहेबांच्या संघर्ष काळात बिकट परिस्थितीत कणखर पणे साथ देणारी माऊली म्हणजे रमाई. अन्याय व संघर्षाच्या काळात हवे ते काम करून बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करणारी सावली म्हणजे रमाई. बाबासाहेबांना डॉक्टर बनण्यास भक्कम साथ देणारी माई म्हणजे रमाई. जसे अंधकार दूर सारण्यास समई,तसे संघर्षात बाबासाहेबांची अतुट साथ म्हणजे आई रमाई…!
सेवा,त्याग,बलिदान करणाऱ्या बाबासाहेबांच्या या त्यागवंती सावलीस फलक रेखाटणातून विनम्र अभिवादन !
— देव हिरे. (कलाशिक्षक )
शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)