loader image

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

Feb 28, 2025


मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणार्‍या मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन साहित्य शिरोमणी कवी कुसूमाग्रज स्वर्गीय वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 59 वी पुण्यतिथी दिनाचा निमित्ताने संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक कवी संदीप देशपांडे सर मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा , जेष्ठ संचालक नरेश गुजराथी,माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, माजी अध्यक्ष व प्रसिध्द कवी प्रदीप गुजराथी उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांन च्या हस्ते स्वातंत्र्यवीर वीर सावरकर, कवी कुसूमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसावा चे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सामाजिक बांधिलकी जपत मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधत दिल्ली येथे संपन्न झालेल्या 98 व्या मराठी साहित्य संमेलन मध्ये मनमाड चे भूमीपुत्र व मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे जेष्ठ सदस्य प्रसिद्ध कवी,लेखक, वक्ते संदीप देशपांडे यांचे तू चाल पुढे या पुस्तकाचे प्रकाशन झाले म्हणून त्यांचा शाल पुस्तक देऊन यथोचित सत्कार सन्मान यावेळी करण्यात आला तर गत 12 वर्षापासून सातत्याने कवी कुसूमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे अभिनव पध्दतीने साजरा करण्यात येतो मनमाड मधील मराठी लेखक संदीप देशपांडे यांच्या पुस्तकाच प्रकाशन मराठी साहित्य संमेलन मध्ये होणे हे मनमाड साठी मोठ्या अभिमानाची व गौरवाची बाब आहे तर त्यांचा सन्मान करणे ही वाचनालयाची जबाबदारी आहे असे वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले. सत्कार सन्मानला उत्तर देतांना संदीप देशपांडे यांनी त्यांच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीच्या सुखद आठवणी नां उजाळा देत दिल्लीतील 98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमा संदर्भात उस्फुर्त कथन करीत सर्वांना चे ऋण व्यक्त केले नरेश गुजराथी, सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी, रमाकांत मंत्री यांनी देखील यावेळी आपले शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले तर संदीप देशपांडे यांनी स्वतः लिखित तू चाल पुढे हे नवीन पुस्तकं मनमाड सार्वजनिक वाचनालयाला या प्रसंगी भेट दिले तर मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कवी कुसूमाग्रज , स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या ग्रंथसंपदेचे वाचकांकरीता प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व वाचकवर्गाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपल्या दैनंदिन कार्यात जास्तीतजास्त मराठी भाषेचा वापर करण्याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास वरील मान्यवरांसह मरेमा विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक हर्षद गद्रे, अक्षय सानप, विश्वास बारसे, भिकचंद नाभेडासर वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर सौ.नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदींसह वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
.