loader image

मनमाड महाविद्यालतर्फे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न

Mar 6, 2025


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी एस देसले यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती मा. दीपक गोगड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सचिव बळीराम गायकवाड, लेखापाल वसंत घुगे, शुभम चितळकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांच्यासह व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याच्या ट्रॅक्टरांना वाहतुकीचे नियम पाळणारे रिफ्लेक्टर लावण्यात आले. या माध्यमातून वाहतुकीचे नियम व नियमांचे पालन कसे करावयाचे या संदर्भातली माहिती दिली. बऱ्याचदा ट्रॅक्टरांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात घडतात व बरेच जण अपघातांना बळी पडतात. जीवन हे अनमोल आहे, त्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे,अशी जनजागृती स्वयंसेवकांनी केली. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.