loader image

मुलींनी स्वतःच्या क्षमता ओळखणे महत्त्वाचे:- डॉ. स्वाती देवरे

Mar 9, 2025


८ मार्च (मनमाड) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमोण गावच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे ह्या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन “भारतीय स्त्रियांना मान सन्मानाचा व कर्तुत्वाचा मोठा वारसा आहे. तो आपण जपला पाहिजे. स्त्री म्हणून आपल्याला निसर्गाने ज्या काही शक्ती प्रदान केल्या आहेत त्यांचा योग्य सन्मान राखला पाहिजे. आधुनिक स्त्री म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्याचा जयघोष जरूर करावा परंतु स्वातंत्र्य व स्वैराचार यांच्यामध्ये असणारे पुसटशी सीमारेषा आपण ओलांडता कामा नये. आपले संस्कार व नैतिक आचरण आपल्याला महान बनवते” असे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास अत्यंत सरळ आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडून त्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना सांगितले. भारतामध्ये कुटुंब पद्धती अत्यंत महत्त्वाची समजली जाते. खरं तर ती भारताची महत्त्वाची ओळख आहे. ती आपण जपली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. आजही समाजामध्ये आधुनिक सावित्री मोठ्या नेटाने लढा देऊन आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष ही साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात कनिष्ठ विभागातील विशाखा शिंदे हिने सावित्रीबाई फुले, गौरी मार्कंडने सिंधुताई सपकाळ व स्वाती मार्कंडने अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा व त्यांच्या जीवनावर आधारित कवितांचे सादरीकरण केले. तसेच वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महिला सबलीकरण या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष अहिरे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य प्रशांत बच्छाव, कुलसचिव समाधान केदारे त्याचबरोबर सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सातपुते, प्रास्ताविक आरती छाजेड तर आभार विजया सोनवणे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती अनुपमा पाटील, श्रीमती योगिता शिंदे, सौ. शितल हिरे व श्रीमती सविता पवार यांनी महत्त्वाचे योगदान दिले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.