loader image

मनमाड महाविद्यालतर्फे अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

Mar 9, 2025


महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मनमाड महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. डॉ. बी एस देसले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. मसगा महाविद्यालयातील प्रा. अतुल वाघ हे जनजागृती शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. ज्यांनी स्वतः मृत्यूनंतर देहदानाचा अर्ज भरलेला आहे असे अतुल वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या स्वातंत्र्यासाठी देहाचे बलिदान करण्यासाठी तत्पर होते, तसेच आपणही नेत्रदान, अवयव दान, देहदान करण्यास तत्पर असावे. त्याच संदर्भातले फॉर्म भरण्याची प्रक्रिया, नियमावली विद्यार्थ्यांसमोर मांडून प्रत्येकाने देह दानासाठी,अवयव दानासाठी तत्पर व्हावे असे आव्हान केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. बी एस देसले यांनी अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी स्वतःही देहदानाची शपथ घेऊन वैद्यकीय क्षेत्रामधील अभ्यासासाठी देहदानाचे महत्त्व विशद केले. दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी आपण नेत्रदानही करावे असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांनी प्रास्ताविक, कुमारी आकांक्षा मार्कंड हिने सूत्रसंचालन तर प्रा सोमनाथ पावडे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी जेष्ठ प्राध्यापक डॉ. जे डी वसईत यांच्यासह एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.