loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा.

Mar 9, 2025


 

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सचिव सायरा सलीम गाजियानी यांनी भुषविले.जागतिक महिला दिना निमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षिकांना संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूजा महाविर ललवाणी,माजी नगरसेविका यास्मिन आझाद पठाण, शबाना सादिक पठाण उपस्थित होते.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.महिला दिनानिमित्त शाळेतील विदयार्थीनींसाठी रांगोळी स्पर्धा,मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,क्राफ्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विदयार्थीनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.संस्थेच्या सचिव सायरा सलीम गाजियानी, पूजा महावीर ललवाणी,विद्यार्थीनी जैनब अशफाक शाह यांनी समाजात महिलांचे महत्व व शिक्षण क्षेत्रात मुलींनी घेतलेली भरारी याविषयी माहिती दिली.शिक्षिका सुवर्णा ठोंबरे यांनी आईची माया या विषयावर सुंदर गीत सादर केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम, शाळेतील सर्व विद्यार्थीनी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री.शेवाळे भुषण दशरथ यांनी यांनी महिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका तहेजीब आरिफ शेख, सविता सचिन कराड यांनी केले.संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.