अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम आणि बुच विलमोर अखेर ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले. फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स च्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले.
सुनिता विल्यम्स या मुळच्या भारतीय वंशाच्या असल्याने हा ऐतिहासिक प्रसंग तमाम भारतीयांना अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. आलेल्या बिकट संकटाला धैर्याने, संयमाने,साहसाने सामोरे जाण्याची प्रेरणा यातून निश्चितच मिळेल.
नूतन मध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक. शाळेचे कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सुनिता विल्यम्स यांच्या कार्याला सलाम केला आहे.
अंगणवाडी गौतम नगर नाशिक विभाग येथे पौष्टीक आहाराचे प्रदर्शन तसेच गृहभेटीच्या माध्यमाव्दारे करण्यात आली. पौष्टीक आहाराविषयी जनजागृती
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्रमांक.२६. गौतम नगर येथे...











