नांदगाव पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले
शिवसेना प्रमुखनेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर बदनामी कारक गाणे तयार करून गायले तो कुणाल कामरा याच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिले.
नांदगाव शहर शिवसेनेच्या वतीने आज नांदगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले, कामरा यास लवकरात लवकर अटक करण्यात यावी व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी सह यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव सागर हिरे प्रकाश शिंदे शिवाजी पाटील रमेश काकळीज भैय्या पगार संतोष शर्मा सुरज पाटील संजय देवरे दिनेश ओचानी बापू सोनवणे रवी सोनवणे गणेश सांगळे अक्षय पवार आदीसह शिवसैनिक उपस्थित होते
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन पल्लवी मंगल कार्यालय मनमाड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...










