loader image

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

Apr 10, 2025


मनमाड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ चित्ररथांना रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याची घोषणा भीमोत्सव समितीने केली आहे. या स्पर्धेचे पारितोषिक रक्कम असेल – प्रथम क्रमांकास 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 7,000 रुपये, तृतीय क्रमांकास 5,000 रुपये आणि सर्व विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येईल. ही स्पर्धा डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी आयोजित केली जात आहे.

मनमाड शहराचा भीमोत्सव हा अत्यंत प्रसिद्ध आहे. या उत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शाहिरी, व्याख्याने, आणि पोवाडे कार्यक्रम सादर केले जातात. मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी राहत असल्यामुळे ही चळवळ विविध कार्यक्रमांतुन दिसून येते. डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि समाजातील समतेचा संदेश पोहोचवण्यासाठी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

डॉ आंबेडकर जयंतीच्या दिवशी, मनमाड शहराच्या प्रत्येक वार्डातून आणि चौकातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित मिरवणुकीत चित्ररथ काढले जातात. चित्ररथ तयार करण्याची तयारी एक महिन्याच्या अगोदरच सुरू होऊन, विविध देखावे तयार करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने काम करत असतात. सुंदर आणि अर्थपूर्ण देखावे तयार करण्यासाठी त्यात प्रचंड मेहनत घेतली जाते. यासाठी मोठा खर्चही केला जातो, कारण प्रत्येक चित्ररथ आणि देखाव्याची सजावट, बांधणी, आणि त्यावर असलेल्या संदेशांना महत्व दिले जाते.

अशा उत्कृष्ट चित्ररथांना गौरविण्यात यावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात येतात. यंदाही उत्कृष्ट चित्ररथाला प्रथम क्रमांकास 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 7,000 रुपये, तृतीय क्रमांकास 5,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार असल्याची घोषणा समितीने केली आहे. या पुरस्कारांचे वितरण १७ एप्रिल रोजी होणाऱ्या महानाट्य कार्यक्रमामध्ये केले जाणार आहे. हे पारितोषिक चित्ररथ स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना त्यांच्या श्रमांचा आणि कलेचा आदर ठरणार असल्याची माहिती भीमोत्सवचे राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, निलेश वाघ, डॉ जालिंदर इंगळे यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशनच्या वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्‍या आणि व्रत अखंड वाचक...

read more
.