loader image

रक्तदान सेवेत सलग 17 वर्ष आनंद सेवा केंद्राचे निःस्वार्थ योगदान

Apr 11, 2025


17 वर्षात 3000 पेक्षा अधिक रक्त बाटल्यानं चे संकलन मनमाड शहर सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक शैक्षणिक, कला,क्रीडा, साहित्य, आरोग्य क्षेत्रात नेहमी पुढे आहे पण आजच्या स्पर्धेच्या काळात कोणत्याही फळा ची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ पणे भगवान महावीर यांच्या जयंती निमित्ताने सलग 17 वर्ष रक्तदान शिबीर आयोजित करणारे आनंद सेवा केंद्र दरवर्षी रक्तदानाचा नवीन विक्रम करून रुग्ण सेवेत अतुलनीय योगदान देत आहे यंदा ही भगवान महावीर जयंती दिनी 41 डिग्री सेल्शियस तापमान असलेल्या भयंकर उन्हाळ्या मध्ये आनंद सेवा केंद्रा तर्फे आयोजित रक्तदान शिबीरात 212 ऐच्छीक रक्तदात्यानी विक्रमी रक्तदान केले आनंद सेवा केंद्रा ने 17 वर्षात 3000 पेक्षा जास्त रक्त बाटल्या चे संकलन शिबीर माध्यमातून केले आहे हा ही एक विक्रम आहे तर 200 पेक्षा जास्त वेळा रुग्णा नां प्रत्यक्ष रक्तदान सेवा दिली आहे आज प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे जाहिरात डिजिटल बॅनर प्रसिद्ध किंवा सोशल मीडिया प्रसिद्धी साठी प्रचंड स्पर्धा असतांना सर्व प्रसिद्धी पासून दूर राहत आपण समाजाचे देणे लागतो या निःस्वार्थ सेवा भावाने हे रक्तदान सेवा कार्य आनंद सेवा केंद्रा चे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी,दिपक शर्मा,अमोल देव,,विनय सोनवणे, अँड .संजय गांधी,चेतन संकलेचा,अनुप पांडे, ललित धांदल, प्रमोद भाबड,अंकुर लुणावत,पियुष जैन, आनंद रांका,मयुर जामखेडकर या सेवा व्रती कार्यकर्ते आणि ऐच्छिक रक्तदात्या नी निरंतर सुरु ठेवले आहे ही मनमाडकरांन साठी कौतुका ची नव्हे तर अभिमानाची बाब आहे रक्तदान शिबीर आयोजन करतांना आनंद सेवा केंद्रा तर्फे उत्कृष्ट व्यवस्था नियोजन असते प्रत्येक रक्तदात्या चा गुलाब पुष्प व प्रमाण पत्र देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात येतो रक्तदात्या शी प्रचंड जनसंपर्क, निःस्वार्थ रुग्ण सेवा ची इच्छा आणि उत्कृष्ट संघ कार्य या जोरावर आनंद सेवा केंद्र या रक्तदान सेवा कार्यात निरंतर मोठे विक्रम करेल रक्तदान कार्यात कार्य करणाऱ्या आनंद सेवा केंद्रा चा मनमाडकराना अभिमान आहे ➖नितीन पांडे भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
.