loader image
[ays_poll id=7]

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Apr 11, 2025

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शरद वाघ यांनी आपल्या व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या महिला शिक्षण, अस्पृश्यता निवारण तसेच एकूणच त्यांनी केलेल्या समाजसुधारनेविषयक कार्यावर प्रकाशझोत टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते होते.तसेच बहुजनांना शिक्षित करण्याचे मोठे काम ज्योतिबा फुले यांनी केले. तसेच त्या काळातील समाजात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, जुनाट भुरसटलेल्या चालीरीती कमी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. असे विचार डॉ पाटील यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी एस देसले, पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुभाष अहिरे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ किरण पिंगळे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

पोषण माह २३ अंतर्गत पोषण भी पढाई भी या उपक्रमातुन साधला जात आहे मुलांचा सर्वांगीण विकास

पोषण माह २३ अंतर्गत पोषण भी पढाई भी या उपक्रमातुन साधला जात आहे मुलांचा सर्वांगीण विकास

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. मनमाड विभाग येथे श्री.चंद्रशेखर पगारे...

read more
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना

  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, पोलीस ठार...

read more
मनमाड नगर परिषद आणि सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

मनमाड नगर परिषद आणि सरस्वती विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

मनमाड - (राजेंद्र धिंगाण)स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२३, माझी वसुंधरा अभियान -४.० अंतर्गत मनमाड नगर...

read more
शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

नाशिक – शहर आणि जिल्ह्यातील लाचखोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच असून काल नाशिक शहरातील खासगी शाळेचा...

read more
.