इंफाळ मणिपूर येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात १६८ किलो वजन उचलून छत्रे विद्यालयाच्या आनंदी विनोद सांगळे हिने सुवर्णपदक प्राप्त केले
इंफाळ मणिपूर येथे ७ ते १२ एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आनंदी विनोद सांगळे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करत आपल्या पहिल्याच शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले भारतातील २४ राज्यांच्या खेळाडूनी स्पर्धेत सहभागी होत चुरस निर्माण केली आहे
आनंदीला छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले.

फलक रेखाटन : दि.१४ एप्रिल २०२५ भीम जयंती “भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळल !”
कला शिक्षक देव हिरे यांचे बाबासाहेबांना शालेय फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून अनोखं अभिवादन....