loader image

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये  स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

Apr 17, 2025


 

शनिवार दि. 12.04.2025
नांदगांव:  मारुती जगधने            –  महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पणन विभागामार्फत राज्यभर स्वच्छ बाजार समिती आवार अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगांव बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर यांच्या हस्ते झाले.
नांदगांव बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. त्यावेळी समिती आवारात पालापाचोळ्यासह विवध प्रकारचा घन कचरा संचित होत असतो. बाजार आवारात रोज शेकडो शेतकरी , व्यापारी , हमाल-मापारी व इतर घटकांची ये-जा असते. त्यामुळे बाजार समिती आवारात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत बाजार समितीच्या सर्व इमारती , प्रवेशद्वार , बाजार आवारावरील दगड धोंडे , झुडपे तसेच सार्वजनिक प्रसाधन गृह इ.ची साफसभाई करण्यात येणार असल्याची माहिती सभापती दर्शन आहेर यांनी दिली. या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बाजार समिती उपसभापती अनिल सोनवणे , सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने , एकनाध सदगीर , साहेबराव पगार , समाधान पाटील , सतिष बोरसे , दिपक मोरे,  अमोल नावंदर , यज्ञेश कलंत्री , अर्जून पाटील , अनिल वाघ , जिवन गरुड ,निलेश इपर , पोपट सानप , अमित बोरसे ,  मंगलाबाई काकळीज , अलकाताई कवडे या संचालकांसह सचिव अमोल खैरनार , शिवसेना पदाधिकारी राजाभाऊ जगताप , भाऊसाहेब काकळीज , आदिंसह अधिकारी कर्मचारी वर्ग , हमाल मापारी कामगार इ. उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.