loader image

काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नांदगाव शिवसेनेतर्फे जाहीर निषेध

Apr 24, 2025


नांदगाव :मारुती जगधने
भारताचा मुकूट असलेल्या जम्मू काश्मिर येथील पह‌ल‌गाम येथे अतिरेक्यांनी निष्याप हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात. सुमारे २८ ते ३० पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना ह्या समूळ नष्ट करण्याची गरज आहे.
शिवसेना नांदगाव शहराच्यावतीने ह्या हल्ल्याचा जळजळीत निषेध करीत असून ह्या हल्ल्याचा प्रतीशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नांदगाव पोलिस ठाणे अंमलदासर यांना देण्यात आले. हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा देत पोलिस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.
या वेळी बोलतांना वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाही तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल म्हणून सरकार ne कठोर पाऊल उचलावे असे मत सुनील जाधव यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी श्री विष्णू निकम सर माजी नगराध्यक्ष अरुण पाटील युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे जगताप सर शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव दीपक मोरे अय्याज शेख रमेश काकळीज भैय्यासाहेब पगार संतोष शर्मा मधुकर मोरे संजय सानप शरद उगले मुस्ताक शेख बापू जाधव भिकन खटके सुनील सर शरद आयनोर तानसेन जगताप भगीरथ जेजुरकर सौ भारती बागोरे सद्दाम शेख महेंद्र गायकवाड दिनेश ओचानी जय खरोटे सुरज पाटील आदींसह शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
.