loader image

नांदगाव तालुक्यात तरुणाचा खून पाच जणांवर गुन्हा दाखल चार जण अटकेत.

Apr 25, 2025


 

नांदगाव :मारुती जगधने

रवींद्र दीपक अहिरे राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव या किशोरवयीन 17 वर्षे वयाच्या तरुणाचा पूर्व वैमान्याशातून खून करण्यात आला ही घटना नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात घडली या घटनेमुळे नांदगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी पैकी चार जणांना पोलिसांना अटक करण्यात यश आलेले आहे यातील पाचवा संशयित आरोपीचा पोलिस तपास घेत आहे.
या घटनेमुळे वाखारी परिसरात एकच खळबळ उडाली मागील सुमारे चार वर्षांपूर्वी वाखरी शिवारामध्ये एका कुटुंबातील चौघांचा निर्गुण खून करण्यात आला होता. या घटनेची
सर्वांना आठवण झाली. सविस्तर वृत्त असे की फिर्यादी दीपक दशरथ अहिरे राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी फिर्यादीत म्हटले की संशयित आरोपी आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार ,विजय एकनाथ सोनवणे, रवींद्र अंकुश गायकवाड सर्व राहणार मोरेवाडी साकोरी झाप तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पाच जणांनी रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय वर्ष 17 राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. वरील संशयित पाच आरोपींनी संगणमत करून दिनांक 23 /4 /25 ते सायंकाळी ते दिनांक 24/ 4 /25 रोजी अकरा वाजेच्या दरम्यान वाखारी शिवारात तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे फिर्यादी यांचा मुलगा रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय १७ वर्ष यास पूर्व वैमान्याशातून या पाच संशयित आरोपीने मिळून फिर्यादीचे मुलास जीवे ठार मारण्याची पूर्वतयारी करून अंगावरील शर्ट फाडून लाथा बुक्क्यांनी मारून त्याचे जीवनकाळावर लाथांनी मारून त्याचा त्याचा गळा कोणत्यातरी धारदार शस्त्राने कापून मुलगा रवींद्र यास जीवे ठार केले व त्यास सदर जागेवर सोडून संशयित आरोपी फरार झाले. या घटनेचा तपास पोलीस उपाधीक्षक बाजीराव सोनवणे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस सा.निरीक्षक संदीप बडे पोलीस उपनिरीक्षक बहाकर इत्यादी करीत असून या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे वाखरी परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात खुनाच्या संदर्भात तर्क वितर्क केले जात आहे पोलीस मात्र कसून तपास करीत आहे घटनेची माहिती कळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून घटनेतील खुनाचा खुनाची नोंद करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.