loader image

पशुपक्ष्यांसमोर जल संकट तहानल्याने होत आहे पशु पक्षांचा मृत्यू

Apr 28, 2025


नांदगांव:
: मारुती जगधने
गेल्या काही दिवसापासून जलस्त्रोत आटू लागल्याने परिसरातील वन्य प्राणी व पक्षासमोर पाण्याचा संकट काळोख धरू लागला आहे .विशेष तलाव आणि छोट्या पाणवट्यांमध्ये पाणीसाठा नगण्य असल्याने कोकिळा व अन्य पक्षांना पाणी घेताना तहान भागवणे शक्य होत नाही. परिणामी अनेक पक्षांचे मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे दुपारी तापमान वाढत असताना पाणी मिळवण्यासाठी पक्षांची झुंबड उडते मात्र कोरडे पडलेले पानवठे त्यांची तहान भागू शकत नाही काही ठिकाणी मृत अवस्थेत आढळलेल्या पक्षांमध्ये कोकिळा ,बुलबुल आणि कबुतरांचा, पारवा, चिमण्या यांचा समावेश आहे .स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने जल व्यवस्था उभी करण्याची मागणी होत आहे.
दुपारी तापमान वाढत असताना पाणी मिळवण्यास कोरडे पडलेले पानवठे त्यांची तहान भागवु शकत नाही काही ठिकाणी मृत अवस्थेत असलेल्या पक्षांमध्ये कोकिळा इतर पक्षांचा समावेश आहे सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करता वन विभागाने सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कृतीम पाणवठे करण्याचे प्रयत्न करावे मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि पावसाच्या प्रदेशामुळे हे मदत अपुरी पडत आहे . निसर्गप्रेमी आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या परसबागेत किंवा मोकळ्या जागांमध्ये छोट्या पाण्याच्या परड्या ठेवाव्यात जेणेकरून तहाणलेले व्याकुळ झालेले प्राण्यांना आणि पक्षांना मदत होईल. दरम्यान तहानलेल्या एका कोकिळा मादीने फ्लाईंग करताना वेळेत पाणी न मिळाल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे .आता रस्त्यांवरती देखील अनेक वृक्षांची तोड झाल्यामुळे पक्षांना सावलीला आधार मिळत नाही त्यामुळे रस्ता ओलांडताना पशु आणि पक्षी अपघातात मृत्यू पडत आहे हरणांची परिस्थिती तशीच झाली आहे नांदगाव तालुक्यामध्ये हरिण पाण्याच्या शोधात फिरतात परंतु त्यांना पाणी मिळत नाही एखाद्या मेंढपाळ किंवा शेळी पालन करणाऱ्या मेंढपाळांच्या पाठलाग करत काही हरिन ज्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्या पाण वट्यावर जातात त्या ठिकाणी पाणी पिण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या ठिकाणी कुत्रे असल्याने त्यांना ते पाणी पिणे शक्य होत नाही आणि ते दिवस दिवस तहानलेल्या अवस्थेत राहतात.


अजून बातम्या वाचा..

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.