राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे,साईराज राजेश परदेशी,आनंदी विनोद सांगळे यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे तसेच छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी वेटलिफ्टिंग समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे
आकांक्षा व्यवहारे व साईराज परदेशी हे सलग तिसऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाच प्रतिनिधित्व करणार आहेत
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी प्रसाद पंचवाघ उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केल