मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 10 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा उर्दू व मराठी माध्यमाचा एकूण निकाल 93.75 टक्के लागला आहे .
उर्दू माध्यमातून एकूण 63 विद्यार्थी व मराठी माध्यमातून 97 विद्यार्थी असे एकूण 160 विदयार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 150 उत्तीर्ण झाले आहेत.व उर्दू माध्यमातून 62 विदयार्थी व मराठी माध्यमातून 88 विदयार्थी उत्तीर्ण झालेले असून शाळेचा एकूण निकाल 93.75% टक्के लागला असून उज्वल निकालाची परंपरा एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज ने कायम ठेवली आहे.
उर्दू माध्यमातून
प्रथम -शेख जिकरा जुल्कर -84.20 %
द्वितीय- शेख जिकरा रऊफ- 81.00 %
तृतीय- शेख अलिजा अयाज -80.00% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
मराठी माध्यमातून प्रथम- शेख अश्मीरा अकील -75.80% द्वितीय- भाबड अक्षरा किरण-71.00%, तृतीय -शेख जवेरिया अमजद – 70.80% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
संस्थेचे अध्यक्ष मो. सलीम अहमद गाजीयानी, सचिव सायराबानो मो.सलीम गाजियानी, सदस्या आयशा मो. सलीम गाजीयानी, सादीक पठाण,मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अख्तर अन्सारी, आरीफ कासम शेख यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.