भारतीय लष्कराच्या जवानांना मान सन्मान आणि राष्ट्रीय एकतेसाठी पुढाकार
मनमाड : राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ मनमाडकरांच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता भव्य ‘तिरंगा पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”च्या घोषणांनी शहराचे वातावरण देशभक्तीमय होऊन गेले .
ही पदयात्रा श्री रु्द्र हनुमान मंदिर पासून सुरू झाली असून महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंडियन हार्टस्पॉट, मनमाड रेल्वे स्टेशन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेहरू चौक, ते सन्मार्ग एकात्मता चौक येथे सांगता झाली प्रमुख वक्त्याचे श्रद्धांजलीपर भाषण होऊन भारतमाता जयघोषाने संपूर्ण मनमाड शहर दुमदुमून निघाले
शेवटी राष्ट्रगीताने रॅली संपन्न होऊन शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली
या यात्रेमध्ये मनमाड शहरातील सर्व राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, व्यापारी वर्ग, कामगार, डॉक्टर्स, वकील, शासकीय कर्मचारी, अधिकारी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
आयोजक:
देशभक्त मनमाडकर नागरिक
(सदर पोस्ट ही प्रत्येक देशभक्त नागरिकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर करावी, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.)












