loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

May 25, 2025

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११ वी साठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू करण्यात आले असून महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांची टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. इयत्ता ११वी साठी प्रत्यक्ष ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विद्यार्थ्यांनी इच्छुक असलेल्या शाखेमध्ये पहिल्याच फेरीमध्ये प्रवेश कसा निश्चित होईल याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या समस्येचे निराकरण करून आपला प्रवेश फॉर्म बिनचूक पद्धतीने भरण्यासाठी सदर प्राध्यापकांची टीम महाविद्यालयात कार्यरत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्याला येणाऱ्या समस्या तसेच मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे यांनी केले.
प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रवेश समिती महाविद्यालय यांचेशी संपर्क साधावा
1) श्री. कातकाडे डी.आर. (विज्ञान शाखा) ९७६६२११८३२
2) श्री. दासनूर व्ही.ए. (कला शाखा) ७५८८२७७५७१
3) श्री. सातपुते व्ही,आर. (कला शाखा ) ९८८१२६२८२०
4) श्री. ठाकोर सी.डी. (वाणिज्य शाखा) ९७८८३१९८१८

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

मनमाड - बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव...

read more
बघा व्हिडिओ – दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडीला झटका – जीवा पांडू गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

बघा व्हिडिओ – दिंडोरी मतदार संघात महाविकास आघाडीला झटका – जीवा पांडू गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा झटका महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्माचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात 10 बळी तसेच रोहित पवार याचीही चमकदार कामगीरी

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्माचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात 10 बळी तसेच रोहित पवार याचीही चमकदार कामगीरी

मनमाड - सोमवार 22 एप्रिल रोजी  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
.